disable right click

Sunday, August 16, 2015

मार्लबोरोचा शाप


एका सिग्रेटीच्या आयुष्याइतका
पाऊस, तिच्या नाजूक चंचल धुराइतक्या विवीड
तुझ्या आठवणी हिरव्या पोपटी गवतात मुरतात.
सफरचंदाचं झाड होऊन उगवतात,

त्या लाल जर्मन कौलांपाठी तुझ्याही मार्लबोरोचे
आषाढी ढग जमा झाले असतील.

-१६-८-२०१५

No comments:

Post a Comment