disable right click

Thursday, December 26, 2013

नेजातचं दुःख

नेजातचं दुःख नक्की काय आहे? मला तो खूप जवळचा वाटतो. पण का? मग येतार आणि लोतेच्या मरण्याच्या दुःखाचं काय? त्याची विल्हेवाट तर मी माझ्यापुरती लावलेलीच नाही. मी नेजातमध्येच गुंतून पडलोय. इब्राहीमची गोष्ट ऐकल्यावर सुसान नेजातला म्हणते, या गोष्टीहून वेगळं असं आपलं काय आहे? येतार, आयतेन, लोते आणि नेजात. 

येतार मरते. तिच्या मरण्याचे संदर्भ घेऊन इतर सगळे जगतात. लोते मरते. तिच्या मरण्याचं दुःख फ़क्त सुसानला. इब्राहीमच्या गोष्टीतला पहिला बळी. नेजात म्हणतो, मला ती आवडण्याइतपत मी तिला ओळखत होतो. तिच्या मरण्याचं काय करावं हे त्याला खरंच कळलं असेल? येतारच्या मरण्याचं काय करावं हे तरी?

येतारची मुलगी आयतेन. वास्तविक ती या सगळ्याची नायिका. पण का? तिचं मुळातच श्रेय काय? तिच्या कमकुवत प्रेरणांच्या कारणांपर्यंत पोहोचण्याची तसदी खरंच कुणी कधी घेणार आहे का? तिच्या दृष्टीने तिने येतार आणि लोते दोघांनाही गमावलंय. यातल्या एका भागाची जाणीव तिला अजिबात नाही. दुसया भागाचं दुःख पचवायला तिच्याजवळ आता अख्खं आयुष्य आहे. पण खरंच हे तरी इतकं खरं आहे का? मला एका क्षणी वाटतं, हा इब्राहीमच्या गोष्टीतला खरा बळी. मग वाटतं तिला या गोष्टीत खरंतर कुठेच स्थान नाही. नेजात भेटणं ही अखेर तिच्यासाठीची मुक्तता. ती- नेजातच्या आयुष्याचं उर्वरीत श्रेय.


फक्त नेजातचं काय?


-१-१२-२०१३.
(द एज ऑफ़ हेवन)

No comments:

Post a Comment