disable right click

Sunday, August 16, 2015

सेपियन


मी जन्माला मी म्हणून आलो, मरतानाही
मी म्हणूनच मरीन, मग
या मधल्या प्रचंड काळातल्या अफाट सेपियन होत जाण्याचं, शेवटी
होणार होतं काय?

माझ्या उत्क्रांतीचे पुरावे, मी
कधी उत्तरादाखल तोंडावर फेकलेच कुणाच्या, तर
माझ्या मानेमागे गडगडून सिद्धू हसतो.

मी वाचायचं नाही ठरवलं, काही बोलायचं ऐकायचं नाही, मी
म्हटलं बिघडत जाणं पुरे, तरी
खरंच काय बिघडलं? चार भिंतींआड एक मन तरीही
उत्क्रांत होतंच रहातं.

-८-८-२०१५

No comments:

Post a Comment