सॉफ़्ट्वेअरचं तण माजलंय
सिल्कबोर्डाच्या जगप्रसिद्ध फ्लायोवरवरून सुसाट पश्चिमी वारे
आमच्या ऐन तारुण्यात घुसलेत
आम्ही रानडे रोड सोडून एम जी रोड ब्रिगेड रोड भटकतोय
इंदिरानगर भटकतोय उल्सूर मुरुगेश्पाल्या शिवाजीनगर भटकतोय
आयटीच्या नावे गांड मारून स्वतःची
सिग्रेटी फुकत टपरीवर ऑफिसच्या खाली सोमवार ते शुक्रवार
शनवार रयवार दारू पिऊन सुखनैव
रस्त्यांवर पबांत मॉलांत
दुकानांत आम्ही खचाखच गर्दी करून
एरपोर्ट रोड मैसूर रोड रिंग रोड
गांडूगिरी करत समस्त
चोवीस तास सिस्टीम चालू आहे सर्वर अप
डेडलाईन टाईट सपोर्ट वाले नियमित झवायला उत्सुक
आम्ही पाळंमुळं उखडलेले
आम्ही बॉलांतलं सिलिकॉन शोधत
-२-५-२०१३.
No comments:
Post a Comment