disable right click

Thursday, December 26, 2013

कॉशीज मध्ये कॉफी पीत बसलेलं माझं माझ्याच काहीतरी अंधुकश्या आठवणीत. सकाळच्या सात वाजताचं. परमप्रिय रविवार कळावा आपला आपल्यालाच इतपत स्प्ष्ट. रस्त्यापलीकडे कबन पार्कात थंड हवा पडली असेल. ती ओळखीची सुंदर सेक्सी बाई कुत्र्याला पळायला घेऊन आली असेल आणि राणी व्हिक्टोरियाच्या भुवईवर आठ्या स्पष्ट उठल्या असतील. किंवा मग राजा एड्वर्डाच्या तळव्याला खाज तरी नक्कीच सुटली असेल. आणि पोलिसांची परेड. हे मला कॉशीज मध्ये बसल्या बसल्या टक्कं जाणवतं. बाकी खरंच कुणाला त्यातलं काही कळणार नाही. आणि मला सकाळी सकाळी तिथली कडवत कॉफीच का आवडते तेही. सकाळच्या सात वाजता स्वप्न पडतं. कुणाला त्याच्याशी काय घेणं देणं? मला लेमनाईड पिणाऱ्यांचे चेहरे तरी कुठे नीट आठवतात.

-१०.९.२०१३

No comments:

Post a Comment