disable right click

Friday, February 1, 2013

स्कल्प्चर


आता या भूमिकेतून बाहेर पडणं शक्य नाही
चारचौघात तर मुळीच नाही.
तुझ्या चेहऱ्यावरचे भाव सगळ्यांना ठाऊक झाले आहेत,
आणि कुणालातरी सोयीची भूमिका त्याने
तुला वठवायला लावून पोबारा केला आहे.
आता भूकंप होऊन गाडला गेलास
तरी या भूमिकेपासून सुटका नाही.
तुझ्या कपाळावर ब्रॉंंझची एखादी आठी उमटणंही
बाबारे, आता शक्य नाही.

-१०-४-२०१२.

No comments:

Post a Comment