आपण म्हणजे भरुन आलेल्या आभाळाचा तुकडा आहोत छोटासा. एकटे आहोत. खूप दूर आहोत. खूप गदगदून गेलोत. कोसळू कोसळू असं वाटतं. पण कुठे? भीती वाटते. पोहोचू का खाली त्याची भीती वाटते. कुठे कोसळू त्याची भीती वाटते. फुकट तर नाही ना जाणार- त्याची भीती वाटते. वारा नागड्या अंगाला झोंबतो आपल्या. आणि वीज आपल्यातूनच कडाडते, ती सहन कशी व्हावी आपल्यालाच? पार गारेगार घामेजून गेलोत आपण या विचारांनी. आणि या काळ्याभोर तुकड्याला तरंगत कुणी ठेवलंय असं अजून? हे तर मान वळवून पहायचीही सोय नाही.
-२२-९-२०१२.
No comments:
Post a Comment