ज्या शहरात उतरत्या छपरांची घरं नी त्यांच्यासोबत नारळाची वगरे झाडं अजुनही शिल्लक असतात ती शहरं पहावीत. अशा शहरात पायी फिरण्याचं सुख चिकार मिळतं. गोव्याचं तसं आहे. आणि प्रत्येक शहरात असा एखादा भाग ब्रिटीशांनी छान करून ठेवलेलाच असतो. चुन्याने रंगवलेल्या भिंतीं नी सज्यातले ऊंचंच खांब पाहून कुणाला रेट्रो वाटणार नाही? कुणाला भारी वाटणार नाही? तुम्हीही रेट्रो असायला हवं. सपाटून भूक लागायला हवी जुन्याची.
फिरत असताना तुमच्या ब्लॅक अँड व्हाईट डोळ्यांना खरंतर सगळंच ब्लॅक अँड व्हाईटं दिसंतंय- असं तुमच्या मागाहून लक्षात येत असेल तर तुम्ही स्वतःला रेट्रो म्हणवून घ्यायला पात्र आहात. आता तुम्ही त्या शहरातलं कॉशी’स शोधायला लागा. सापडेलच ते तुम्हाला. तुम्ही तिथे या जन्मात किमान एकदातरी जायलाच हवं.
मी खूप शिव्या खाल्ल्या. मी मरणांत पायतोड करून त्या तिघांना कॉशी’स पर्यंत घेऊन आलो. खरंतर माझ्या सोबत कोण आहे याचा मला त्या क्षणाला काहीही फरक पडंत नव्हता. मी मुळात पहिल्यांदा आलो होतो. फार आशा लावून कधीपासून आलो होतो. निर्निराळ्या लोकांसोबत स्वतःला तिथे इमॅजीन करकरुन आलो होतो. वास्तवाइतकं वास्तव दुसरं काहीही नसतं. आणि वास्तव फार छान होतं. उगीच तुलना बिलना करण्यात काही पॉईंट नाही. लिओपोल्ड नी मॉंदेगार वगरे सगळं ठीक आहे.
बॅंगलोर मध्ये मेट्रो वगरे उगीच्च्या उगीच बनवून या लोकांनी आसपासची वाट लावून टाकलेली आहे हे मग कळलं, पण कॉशी’स आतून खरंच खूप छान आहे. आपल्याला जाम आवडेल असं आहे. इराण्याचं वगरे अर्थातच आहे. अगदी स्लो आहे.
घाई बिई अजिबात नाही. दिवे वगरे जेमतेम दिसेल इतपत. असल्या ठिकाणी जायची हाईफन्डू लोकांना आजकाल फार हौस असते. असलीच माणसं इथे फार दिसतात. आपण अगदीच रॉ आहोत या बाबतीत. नवे नवेले आहोत. साध्या माणसांच्या चेहयावरचे इंटलेक्चुअल भावही आपल्याला अजून चकित करतात.
तर मी वगळता इतर तिघांचीही डोकी तात्काळ सटकलेली होती. मेन्यू वाचायला होपलेस आहे. खायला त्याहून आहे. परवडून घेऊ शकतो इतपत महाग आहे. वेगवेगळी ऑमलेट्स नाश्याला आणि चहा कॉफी वगरे दोन तीन प्रकारची या इथल्या हीट गोष्टी असतील. एक कॉफी छोट्याश्या किटलीतून देतात. ती मग आपण कपात ओतून घ्यायची वगरे ऐट करायची असते. चेहरा खूप अलूफ ठेवायचा असतो त्या वेळी. बिअर महागच. त्याव्यतिरिक्त केक्स मिळतात. बावीस रुपयात ब्रिटानियाचा खरंतर अख्खा पुडा वगरे येत असतो आजकाल. पण आम्ही एक पीस खाल्ला तेवढ्यात.
स्माईली नावाची एक वेगळी गोष्ट तेवढी मिळते. इन अ वे बटाट्याची भजीच पण स्माईलीच्या आकारातली. ती मयॉनीज बरोबर देतात. तेवढी सगळ्यांनी आनंदाने खाल्ली. समोर फ़्रेंच मुलींचा एक ग्रुप बसला होता. सोबत त्यांची हॉट इंडियन गाईड वगरेही होती. मी आपण होऊन त्यांच्याकडे तोंड करून बसता येईल अशी जागा फाटकन पटकावल्यामुळे त्याचा रागही माझ्यावर होताच. बाकी बघण्यासारखी माणसं तिघांना तरी कॉशी’स मध्ये दिसली नाहीत. कुणाकडे आणि कुणातलं काय बघावं याबाबतीतल्या त्यांच्या इंटलेक्चुअल समजा अजून तरी पक्व झाल्या नसाव्यात. अन्यथा मला नुसती कोरडी माणसं बघायलाच फार आवडतात. आणि इथे खायला वगरे मुळातच यायचं नसतं हे कुणाला समजवायला वगरे लागू नये या वयात. असं तिघंही अर्थात मग आळीपाळीने म्हणाले.
कॅशिअर बंद उंच काचेआड बसतात. त्यांच्यापैकी कुणीही इराणी वगरे दिसत नाही. त्यांच्याकडे बिलासाठी जुनीच मशिन्स आहेत. पाठी एका कपाटात जुनेपुराणे तीन चार टेपरेकॉर्डर्स ठेवलेले आहेत. भिंती सकाळी क्रीम कलरच्या दिसत असाव्यात. त्यांच्यावर जुनीच कुठलीतरी मोजकी पेंटिंग्स लावलेली आहेत. खुर्च्या आणि टेबलं अर्थात काळ्या पॉलीशची. आणि मधेच काळे चमकदार ओशट शिसवी खांब. कुणीही धड दिसू नये अशा तर्हेने बांधलेले. खाली चौकोनी नक्षीचं तसंच ते सुप्रसिद्धंच कार्पेट. कॉशी’स. असं एकदम खास रेट्रो.
बिल दोनशे बारा झालं. आम्ही टिपा वग्रे देणं कधीच बंद केलंय. किती देणं योग्य असतं याचा मला काहीही अंदाज आणि समज नाही. आणि याआधी आईवडिलांच्या पैशातून टिपा देणं आमान्य म्हणून. इथले वेटर बरेच सोफ़िस्टिकेटेड म्हणावेत अशा तर्हेचे आहेत. त्यांची ऐट आहे. आम्ही स्ट्रॅटेजिकली कार्ड द्यायचं नक्की केलं. माझं अर्थात. बिलावर सही केल्यावर कार्ड परत देऊन वेटर तिथेच उभा राहिला. पद्धतच किंवा सवयच तशी असावी. म्हणजे इकडून तिकडून पोपटच. मी दहा रुपये छानपैकी ह्सून त्याच्या हातात दिल्यावर तो थॅंक्यू सर म्हणायच्या आत तिघेही कॉशी’स च्या बाहेर होते.
कॉशी’स.
३९, मार्क्स रोड, शिवाजीनगर,
बॅंगलोर.
-१८-९-२०१२.

No comments:
Post a Comment