तू नी मी लाईट हाऊसच्या भिंतीवरून उडी मारून खरचटत समुद्राच्या जवळ जवळ म्हणत त्या भल्याथोरल्या दगडाच्या पार टोकाला जाऊन बसलो. अगदी समुद्रात पाय सोडून बसता येईल इतक्या जवळ. सूर्य अगदी टेकलाच होता- बुडणारच होता. आपण त्याला सीझ केलं- आपल्या आठवणींत. तुझ्या माझ्या कॉमन आठवणींच्या व्हॉल्ट मध्ये. बिलगून वगरे बसलो काय तेंव्हा? तेवढं भान कुठे होतं. आधीच सात मजले चढून उतरून श्वास गच्च झालेले. आणि वरच्या गर्दीत जीव घुसमटलेला. वरून आपण हा दगड ठरवला आणि धडाधड उतरत इथे येऊन पोहोचलो. मला खरंतर जोराची लघवी लागलेली. पण सूर्य मग गेलाच असता. अगदी कसाबसा थांबला होता इतकाच. लालमुया गालाचा पोर वाटंत होता. सूर्य असा लहान मुलासारखा आयुष्यात अगदी पहिल्यांदा पाहिला होता. तोवर दाबणं भागच होतं. तसेच बसलो. अगदी झोपून सूर्यास्त बघितला.
लाईट हाऊसच्या आठवणी खरंतर इतक्याच. तुझ्यासोबतच्याही. मग तू गायबच झालास आठवणींतून. त्या लालभडक लाईट हाऊसच्या मागे कुठे तरी निघून गेलास. मला मात्र त्यातल्या गोल जिन्याची स्वप्नं अधूनमधून पडत असतात. त्यातला समुद्राचा आवाज कानातून घुमल्यासारखाही वाटतो. सोबत तू आठवतोस. तुझ्या शरीरावर सोनेरी केस असावेत असं मी नेहमी कल्पित आलेलो आहे. ते मावळतीच्या त्या सोनेरी उन्हात चमकून उठलेले मला स्वप्नात दिसतात. त्रिवेंद्रम फक्त तेवढ्यासाठी मला लक्षात राहिलेलं आहे.
-१०-१०-२०१२.

No comments:
Post a Comment