disable right click

Thursday, January 31, 2013



ळूहळू सगळ्या वस्तू हलवल्या. गोदारच्या कंटेंप्ट मधल्या सारखं घर अगदी सुट्सुटीत. नुसत्या नुसत्या रिकाम्या खोल्या. हवा उजेड चिक्कार. भिंतींवर काचांवर. शंभर रुपयांची वाईन जमिनीवर ओतून आनंद साजरा केला. घरभर गोड फ़रमेंटेड वास.

एक चुकार कविता लिहिली नाही की धड पंधरा ओळी लिहिल्या नाहीत. वांझ वांझ करत मन उबवत ठेवलं. मग पोरपणा गेला. पोक्तपणा आला. काय फायदा? वाटायचं वाटून गेलं. वाटंत राहण्याचं दुःखही वाटेनासं झालं. न वाटणं आठवणींत जमा. सगळा खेळखंडोबा. गच्चीतल्या रात्री फ़ुकट.

घरभर हलवाहलवीचा कचरा निवांत पडून आहे. पायाला धूळ लागतेच आहे. घशातल्या घशात खाकरणंही घरभर घुमतंच आहे. बिनबुडाच्या आयुष्यातून बरंच काही निवांत घरंगळून जातच आहे.

-३१-१-२०१३.

No comments:

Post a Comment