यूट्युब वरच्या व्हिडिओतून काहीबाही करून गाणं वेगळं काढलं. विहीरचं थीम साँग. तिथून मग माझ्या Tab वर.
भल्या सकाळी वडाच्या झाडाकडे चालत गेलो. तिचं बनयान ट्री. तिनेच शोधलेलं. अगदी अशक्य वाटावं अशा ठिकाणी सोबत एका देवळाला घेऊन उभं असलेलं. बाजूला उभ्या राहत असलेल्या बिल्डिंग्सना सांभाळून घेत. तिचे सगळे संध्याकाळी तिथवर चालत जाण्याचे आग्रह मी धुडकावले. ते झाड या लोकांनी तोडलं नाही हे तिचं भाग्य. आणि अर्थात माझं. कंपनी इथे होण्याआधी शंभर वर्ष ते असेल. त्याचीच ही सगळी जागा. बाकी आम्ही सगळे उपरे. आता त्याच्या खाली किमान बसता येतंय हेच चिक्कार.
तिच्या संध्याकाळ तिने फार सुंदर लिहून ठेवल्यात आणि माझे सगळे अनुभव तिने तिच्या शब्दात बांधून टाकलेत. मी निव्वळ सकाळचा शुभ्र वास घेत तिथे. नुकत्याच पडू लागलेल्या थंडीत धुक्यात आणि कशा कशात अर्धामुर्धा. अंतर्बाह्य घामेजलेला.
मग कानात इअर फोन्स टाकून ते थीम साँग ऐकताना माझ्या अंदाजाप्रमाणे कम्प्लीट हादरण्याचं सेल्फिश सुख अनुभवलं. हे सगळं आता किती आवडायला लागणारे याची सुंदर जाणीव पुन्हा वाटून घेत.
गाणं आणि आयुष्य मग लूप मध्ये सोडून दिलं.
-११-१-२०१३.

wah... super asacha anubhav aathavun gela...ani docyat nakoti chakra firayala lagli aata asa vatata ugachacha.
ReplyDelete