ट्युरीन हॉर्सच्या मनात नेमकं काय होतं असेल? तो असा चालता चालता अचानक का थांबला असेल? बेल तार म्हणतो तसं, कुणाला त्या घोड्याबद्दल खरंच काय ठाऊके, आणि कुणी ते जाणून घ्यायचा खरंच प्रयत्न वगरे केलाय का एरव्ही?
मी माझं आयुष्य असं आलटून पालटून कुणाकुणाच्या दोऱ्यांवर अजूनही शेकायला टाकत असताना, मला ट्युरीन हॉर्सची आठवण का होत राहते?
...
फान होच्या कळण्यातलं थोडं तरी कळणं साधणारे का कधी कुणाला? त्याच्या आऊट देअर मधल्या पॅसेजच्या थंड भिंतीला पाठ टेकवून आणि अर्धा पाय दुमडून आपण कसली तरी वाट बघत उभे आहोत असं का वाटतं, किंवा त्याच्या लाईफ़ इन स्लमधल्या त्या नेमक्या क्षणाशी माझा काहीतरी संबंध आहेच आहे, असं का वाटंत? त्याच्या फोटोंत अक्षरशः अख्खं आयुष्य लपवायला जागा आहे. त्याचे सगळे ब्लॅक अँड व्हाईट फोटो मी माझ्या मनात विरळवून टाकलेयत. त्यांतल्या उन्हाचं मला प्रचंड आकर्षण आहे.
एक मोजकी माणसं सोडली तर बाकी कुठले संदर्भ आयुष्यभर तेच राहतात? आपलीच जाण बदलते, आपल्याच सवयी बदलतात, रुटीन बदलतं, कपड्यांचे म्हणता म्हणता शंभर सेट होतात- जुने कपडे कंटाळवाणे होतात. आपलं आयुष्य फार फार तर त्या चार दोन माणसांपुरतं स्थिर करता येत असेल, मग या बाकी सगळ्याचं काय? आणि हेच कळायचंय का शेवटी? की आपल्याला पैसाच्या खांबासारखं- असलोच तर- स्थिर, निश्चल असायचं आहे? फान होच्या फोटोतल्यासारखं? बाकी जग आणि त्यातली माणसं अनंत काळ आपल्याभोवती गरगरत राहिली तरी.
या एवढ्यासाठी कुठला नीत्शे माझ्या गळ्यात पडून रडणारे?

No comments:
Post a Comment